Karthik Aryan Health Update : अॅक्शन सीन करताना दुखापत; बॅालिवूड अभिनेत्यावर पार पडली शस्त्रक्रिया, जाणून घ्या हेल्थ अपडेट
Karthik Aryan Health Update : सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये कार्तिकच्या टीमने त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि त्याची प्रकृती ठीक आहे, असे म्हटले आहे.

Karthik Aryan Health Update : बॅालिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असून, अशाच एका मोठ्या प्रोजेक्टचा अॅक्शन सीनच्या चित्रीकरणावेळी तो जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या गुडघ्याला गंभीर मार लागला होता. यानंतर त्याला तातडीने फोर्टिस रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नुकतीच त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून त्याच्या हेल्थ अपडेटविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याच्या टीमने त्याच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावरून पोस्ट करत माहिती दिली. या पोस्टमध्ये कार्तिकच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तो लवकरच चित्रीकरणासाठी परतणार असल्याचे म्हटले आहे. ही पोस्ट समोर आल्यानंतर कार्तिकच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कार्तिक आर्यनच्या टीमने काय माहिती दिली?
सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये कार्तिकच्या टीमने त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि त्याची प्रकृती ठीक आहे, असे म्हटले आहे. तसेच कार्तिकला नेमकी दुखापत कशामुळे झाली याचीही माहिती देण्यात आली आहे. “कार्तिक आर्यनला त्याच्या चित्रपटाच्या सेटवर एका ॲक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण करताना गुडघ्याला दुखापत झाली. त्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असून तो आता घरी परतला आहे, जिथे तो विश्रांती घेत आहे आणि बरा होत आहे. लवकरच तो पुन्हा चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल.”
२०२३ मध्येही घडली होती अशीच घटना
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा कबीर खानसोबत एका चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव समोर आलेले नसले तरी हा चित्रपट एक अॅक्शन चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहेत. याच चित्रपटाच्या शूटिंगवेळी अॅक्शन सीन करताना कार्तिक जखमी झाला होता. यापूर्वी २०२३ साली प्रदर्शित झालेल्या ‘शहजादा’ चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आता पुन्हा एकदा त्याच्यासोबत तशीच घटना घडली आहे.
‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार
कार्तिक आर्यनच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्याने बॅालिवूडमध्ये प्यार का पंचनामा या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याला ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात कार्तिकच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. अनेकांनी तर ‘चंदू चॅम्पियन’ला कार्तिकच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे म्हटले होते.
Trump on Hormuz: “होर्मुज आता अमेरिकेचा…” ; ट्रम्प यांच्या दाव्याने इराणचा संताप अनावर






