Rohit Pawar: भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश; ‘या’ अटीवर रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन केलं स्थगित
Rohit Pawar: चर्चा करून तोडगा निघाला नाही तर मराठवाड्यात आंदोलन करू; रोहित पवारांचा इशारा

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अखेर अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे. सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी त्यांनी पंढपूरात आंदोलन सुरू केले होते. काल त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस होता. परंतु भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
या भेटीदरम्यान, रविवारी रात्री 10:30 वाजेपासून 11:15 वाजेपर्यंत मंत्री गिरीश महाजन आणि आमदार पवारांची चर्चा झाली. त्यानंतर गिरीश महाजन यांची फोनवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी गिरीश महाजन यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. आगामी पावसाळी अधिवेशन हे 22 जून पासून सुरु होणार आहे. त्याआधी रोहित पवार आणि शेतकरी नेत्यांचं शिष्टमंडळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडेल. यावेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिली. त्यानुसार आता रोहित पवार 22 जूनपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत.
Girish Mahajan
…अन्यथा मराठवाड्यात आंदोलन करू
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला जाण्याच्या प्रस्तावावर आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही मान्यता दिली. यावर रोहित पवार म्हणाले की, “22 तारखेला अधिवेशन असून, त्या आधी सरकार मिटिंग घेणार आहे. 30 जूनपासून कर्जमाफी लागू होणार आहे. जे बदल आहे, ते 30 जून आधी होणार आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात.
याकरिता शेतकरी संघटनेचे नेते इथे आलेले लोक सर्वपक्षीय लोकांना घेऊन आपण बैठकीला जाऊ. अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन आणि यावर चर्चा करून निर्णय करू. तसेच चर्चा करून तोडगा निघाला नाही तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू, असंही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, रोहित पवार यांनी 22 तारखेच्या आधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याच्या अटीवर उपोषण मागे घेतलं. यानंतर संत नामदेव पायरी येथून आमदार रोहित पवारांनी आंदोलनाची सुरुवात केली होती. त्यामुळे संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठलाच्या प्रसादाचा पेढा आणि सरबत घेऊन त्यांनी अन्नत्याग सोडला.
📍पंढरपूर
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकार प्रामाणिकपणे प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत… pic.twitter.com/XC9sFcaUJX
— Girish Mahajan (@girishdmahajan) June 15, 2026
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – गिरीश महाजन
गिरीश महाजन यांनी देखील ट्वीट करत सांगितले की, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकार प्रामाणिकपणे प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे, ही बाब त्यांच्यासमोर मांडत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.
या विनंतीला मान देत आमदाररोहित पवार यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांवर योग्य तो मार्ग काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे म्हंटले.
हेही वाचा :





