Infrastructure sector : पाच महिन्यांत प्रथमच पायाभूत क्षेत्राच्या उत्पादनात घट; मार्चमध्ये 0.4 टक्क्यांची घसरण
Infrastructure sector : फेब्रुवारी 2026 मध्ये, आठ मुख्य पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये 2.8 टक्क्यांनी वाढ झाली होती.

Infrastructure sector : कोळसा, कच्चे तेल, खते आणि वीज यांच्या उत्पादनात घट झाल्याने मार्चमध्ये पायाभूत क्षेत्राच्या उत्पादनात 0.4 टक्क्यांची घट झाली असून, गेल्या पाच महिन्यांतील ही पहिलीच घट आहे.
फेब्रुवारी 2026 मध्ये, आठ मुख्य पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये 2.8 टक्क्यांनी वाढ झाली होती. 2025-26 मध्ये, या क्षेत्रांनी 2.6 टक्के वाढीचा दर नोंदवला, तर 2024-25 मध्ये हा दर 4.5 टक्के होता. पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता वाढण्याऐवजी कमी झाल्यामुळे आता या आकडेवारीचा औद्योगीक उत्पादनाच्या आकडेवारीवरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – सोने-चांदीच्या दरात झाली वाढ; पहा ताजे दर
व्यापार युध्द व भूराजकीय तणावाचा परिणाम होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. महागाई वाढू नये यासाठी धंधन दरवाढ टाळण्यात आली असली तरी लवकरच ती करावी लागणार आहे. त्यानंतर महागाई वाढून त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे.





