पुणे जिल्हा | सणांवर महागाईच्या राक्षसाची वक्रदृष्टी

वाल्हे, (वार्ताहर) – मागील वर्षी अतिअल्प पर्जन्यमानामुळे ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. यावर्षीही मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस समाधानकारक पाऊस अद्यापपर्यंत पडला नाही.
यातून गोरगरीब जनता उपलब्ध पाणीसाठ्यावर, शेतात नगदी पीक घेत असून यातून चार पैसे जमविण्याचा प्रयत्न करीत, ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग कसाबसा सावरत असतानाच महागाईचा हा राक्षस मिळवलेली तुटपुंजी गिळंकृत करायला निघाला आहे.
ऐन सणासुदीच्या काही दिवस आगोदरच दिवसेंदिवस किराणामाल वस्तूंचे बाजारभाव वाढत असल्याने गोरगरीब जनता महागाईने होरपळून निघत आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची मागील वर्षी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे,शेताती उभी पिके कोमेजून गेली होती. तर यावर्षीही अद्यापपर्यंत काही भागात समाधानकारक पाऊस न पडल्याने,
शेतकरीवर्गावर तसेच ग्रामीण भागातील मोलमजूरी करून जगणार्या जनतेवर, येणारे सण कर्जबाजारी होऊन,साजरी करण्याची वेळ आली असून,सामान्य जनता, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण गोड साजरा करीत होता.
मात्र,यावर्षी वाढती महागाई,यामुळे सामान्य जनतेचे येणारे सण साजरा करताना आर्थिक चणचण जाणवणार असल्याने, येणारे सण कडू होणार असल्याची चर्ची ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबात होत आहे.
जगण्यासाठी जीवनावश्यक असलेल्या सर्वच वस्तूची होत असलेल्या दरवाढीने, कष्टकरी जनता भरडून निघत आहे.एकीकडे हाताला काम नाही. तर दुसरीकडे महागाई गगनाला टेकली असूनही, याबाबत ना सत्ताधारी ना विरोधीपक्ष आवाज उठवत नसल्याने, सर्वसामन्य जनतेला कोणीही वाली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
फराळाला महागाईची फोडणी
खाद्यतेलामध्ये शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन आदी तेलाचा वापर करणार्यांची संख्या सर्वाधिक आहे.ऐन सणासुदीच्या आगोदरच ग्रामीण भागातील जनतेचा महागाईत भरडून निघत आहे.
त्यातच डाळींच्या किंमती देखील यापूर्वीच वधारल्याने दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी बसणार आहे.
तसेच किराणामालातील अनेक वस्तूचे भाव मागील वर्षभरात अनेक पटीने वाढले आहेत. तेल, डाळीचे भाव गगनाला टेकले आहे. सर्वच वस्तूंचे बाजारभाव दररोजच वाढत असल्याने, जनता भरडत आहे.
किराणामाल दुकानातील दर
सोयाबीन 15 लिटर तेल डबा : 2050
सूर्यफूल तेल डबा : 2040
शेंगदाणा तेल डबा : 2550
सोयाबीन तेल पुडा : 140
सूर्यफूल : 145
शेंगदाणा 1 लिटर : 200
चौकट : कडधान्य :
तूरडाळ : 170
मूगडाळ : 120
मसूरडाळ : 90
उडीदडाळ : 135
चणाडाळ : 100
खोबरे : 240
खोबरेल 100 रुपये महाग
मागील तीन महिन्यांपूर्वी 140 रुपये खोबरे होते. तीन महिन्यांत 100 रुपये खोब-यांचा दर वाढवू 240 रुपये झाला आहे. मिरची पासून ते, मसाल्याच्या पदार्थापर्यंत सर्वच जीवनाश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.


