पुणे जिल्हा | काऱ्हाटीत संसर्ग आजार बळावले गावकरी घायाळ

काऱ्हाटी, (वार्ताहर)- बारामती तालुक्यातील काऱ्हाटी परिसरात उन्हाची तीव्रता ४१ डिग्री सेल्सिअस असल्यामुळे काऱ्हाटीवासियांना याचा मोठा फटका बसत आहे. नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे वातावरणामुळे उष्णतेच्या लाटेने तीव्रता निर्माण झाली आहे. काऱ्हाटी, माळवाडी, फोंडवाडा, जळगाव, सुपेसह परिसरातील नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णतेमुळे घराच्या बाहेर निघणे ही कठीण झाले आहे. यामध्ये सध्या बाहेरून ये जा करणाऱ्या मोटरसायकलवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. उन्हामुळे शेतातील लागवड केलेल्या मिरची, कलिंगड, खरबूज व काही ठिकाणची मल्चिंगवर लागवड केलेले वाऱ्याने उडून गेले आहेत.
त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असल्याचे चित्र दिसून आले आहे. वातावरणाची तीव्रता जास्त असल्याने काही शेतकऱ्यांनी शेतातील कामे सुद्धा बंद ठेवली आहे. मे महिना म्हणजे शेतातील मशागतीच्या काम करण्यासाठी असला तरीही उष्णतेची लाट जास्त आहे
यामुळे शेतातील कामे सुद्धा बंद केली आहे. या सर्व गरज वातावरणामुळे लोकांना सर्दी खोकला होत असल्याने खासगी व सरकारी दवाखान्यात रुग्णाच्या संख्येत वाढ झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
वातावरणामुळे सुपे परिसर हैराण दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे व वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. पाऊस झाल्याने वातावरण गरम झाल्याने रुग्णांच्या आजारात सुद्धा वाढ निर्माण झाली आहे यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर निघताना डोक्याला रुमाल पाणी सोबत ठेवावे.नागरिकांनी काळजी घ्यावी. – डॉ. श्रीप्रसाद वाबळे , लीलागुलाब हॉस्पिटल सुपे





