Baramati Water Cut: बारामतीकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा; तुमच्या भागाचा नंबर कधी?
Baramati Water Cut: नीरा डाव्या कालव्यातील प्रवाह बंद झाल्याने बारामती नगरपरिषदेचा निर्णय; गुरुवार १८ जूनपर्यंत नियमित, तर शुक्रवारपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा.

Baramati Water Cut – नीरा डावा कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने आणि उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने बारामती शहरासह जळोची, रुई, तांदुळवाडी आणि बारामती ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यामुळे बारामती नगरपरिषदेने पुढील काळात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार,दि. १८ जूनपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार असून त्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पाटस रिंगरोड, सायली हिल आणि जळोची येथील जलशुद्धीकरण केंद्रांमार्फत विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार शुक्रवारी (दि. १९ जून) आणि शनिवारी (दि. २० जून) वेगवेगळ्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. १९ जून) महाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवके इस्टेट, पाननळी, समर्थनगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, वडार सोसायटी, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर, पोस्ट रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, विजय नगर, साईगणेशनगर, अशोकनगर,
आनंदनगर, भिगवण रोड परिसर, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, त्रिरत्न कॉलनी, महादेव मळा, सद्गुरुनगर, मेढद रोड, क्षत्रियनगर, तांदुळवाडी वेस चौक, मारवाड गल्ली, महावीर पथ, नेवसे रोड, सुभाष चौक, कसाब गल्ली व कचेरी रोड या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शनिवारी (दि. २० जून) कसबा फळटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड, हनुमान नगर, सातव वस्ती, शिवाजीनगर, जमादार रोड, कारभारी नगर, सावता माळीनगर,
श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशील नगर, साठेनगर, जगताप मळा तसेच जुना व नवीन मोरगाव रोड परिसरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.सायली हिल व जळोची जलशुद्धीकरण केंद्रातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचेही नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. १९ जून) रुई गाव, डेरेवस्ती, सायली हिल, सूर्यनगरी, देसाई इस्टेट, अंबिकानगर, जळोची गावठाण, बावडे वस्ती, तानाजी नगर, महिला सोसायटी आणि प्रगतीनगर येथे पाणीपुरवठा बंद राहील.
शनिवारी (दि. २० जून) तांदुळवाडी गावठाण, सहयोग सोसायटी, नीरा कॅनॉल सोसायटी आणि दूधसंघ सोसायटी या भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. नगरपरिषदेने नागरिकांना आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नीरा डावा कालव्यातील प्रवाह पूर्ववत सुरू होईपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा व्यवस्था कायम राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






