माजी सरपंचासह कांदा व्यापाऱ्यास संसर्ग
Updated On:

मांडवगण फराटा (वार्ताहर) – येथील 65 वर्षीय माजी सरपंचांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल दुपारी प्राप्त झाला होता. तर सायंकाळी गणेगाव दुमाला येथील एक 40 वर्षीय कांदा व्यापारीही संक्रमित सापडला.
या माजी सरपंचांना येथील एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते; परंतु जास्त त्रास जाणवू लागल्याने लोणी काळभोर येथे पुढील उपचार सुरु आहेत. तसेच कांदा व्यापाऱ्यावरही पुण्यात उपचार सुरु आहेत. मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी रुग्णाच्या संपर्कातील नऊ व्यक्तींना होम क्वारंटाइन केले आहे. तर गणेगाव दुमाला येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना क्वारंटाइन केले आहे. पाच दिवसांसाठी मांडवगण फराटा लॉकडाऊन करण्यात आले आहे.





