#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचे Team India समोर 353 धावांचे लक्ष्य…

Live Cricket Score Today Match, India vs Australia 3rd ODI 2023 : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना आज (बुधवार) राजकोट येथे होत आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकलेला भारतीय संघ या सामन्यासह संपूर्ण मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखून ऑस्ट्रेलियाला व्हाइटवॉश देण्यासाठी सज्ज आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सात गडी गमावून 352 धावा करत भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाकङून फलंदाजीत मिचेल मार्शने 84 चेंडूंत 13 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 96 धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने 56, स्टीव्ह स्मिथने 74 आणि मार्नस लॅबुशेनने 72 धावांंचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, मात्र त्यासाठी त्याने 10 षटकांत 81 धावा दिल्या तर कुलदीप यादवने 10 षटकांत 48 धावा देत 2 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येेेेकी 1 विकेट घेतली.





