\nस्मिथही अनावश्‍यक फटका मारून 35 धावांवर परतला. त्याने या खेळीत 24 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावला. दरम्टयान ग्रीनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 30 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 61 धावा करुन बाद झाला. ग्लेन मॅक्‍सवेलने निराशा केली. यावेळी भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, जोस इंग्लिस व टीम डेव्हिड यांनी चमकदार कामगिरी करत डाव सावरला. इंग्लिस10 चेंडूत 17 धावा करुन बाद झाला.

\n

त्या पाठोपाठ डेव्हिडही 14 चेंडूत 18 धावा करत बाद झाला मात्र, तो पर्यंत ऑस्ट्रेलियाची द्विशतकी धावसंख्या पार झाली होती व भारताचा पराभव स्पष्ट दिसत होता. दीग्गज फलंदाज बाद होत असताना मॅथ्यु वेडने नाबाद 45 धावांची वादळी खेळी केली व अखेरच्या षटकात संघाचा विजय साकार केला. त्याने या खेळीत 21 चेंडूत 6 चौकार व 2 षटकार अशी आतषबाजी केली. पॅट कमिन्स 4 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून अक्‍सर पटेलने 3 तर, उमेश यादवने 2 गडी बाद केले.

\n

भुवनेश्‍वर सुमार

\n

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर गटात भारतीय संघाला जे दोन महत्वपूर्ण पराभव स्वीकारावे लागले त्याला कारणीभूत ठरला तो भुवनेश्‍वर कुमार. त्याने या दोन्ही सामन्यांत 19 वे षटक टाकले व तेथेच भारताचा पराभव स्पष्ट झाला होता. तेच या मालिकेतही घडले. या सामन्यातही त्यानेच 19 वे षटक टाकले व त्याच्यावर आक्रमण करत ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ऑस्ट्रेलियाला तब्बल 52 धावा बहाल केल्या.

\n

तत्पूर्वी, सलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक, सूर्यकुमार यादवच्या उपयुक्त खेळीनंतर हार्दिक पंड्याने केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने तिन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 209 धावा करण्याचे मोठे आव्हान ठेवले.

\n

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरन फिंचने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदीाज दिली. मात्र, त्याचा हा निर्णय साफ चुकला हेच भारताच्या फलंदाजंनी सिद्ध केले. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मासह राहुलनेच डावाची सुरुवात केली. रोहितने केवळ 11 धावा केल्या तर आशिया करंडक स्पर्धेत शतकी खेळी करत भरात आलेला विराट कोहलीही अपयशी ठरला.

\n

त्यानंतर मात्र, आजवरचे अपयश बाजूला सारुन राहुलने सूर्यकुमारसह अर्धशतकी बागीदारी करत संघाचे शतक फलकावर लावले. राहुलने अर्धशतक साकार केले. त्यानंतर धावांचावेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 55 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 35 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 षटकार फटकावले.

\n

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंड्याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. या दरम्यान अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला सूर्यकुमार 46 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 25 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. यावेळी पंड्याने फलंदाजीचा गिअर बदलला व वादळी खेळी केली. ऋषभ पंतच्या जागी संघात स्थान देण्यात आलेला दीनेश कार्तिक व अक्‍सर पटेल प्रत्येकी 6 धावांवर बाद झाले.

\n

पंड्याने आपले अर्धशतक थाटात साकार केले. त्याने हर्षल पटेलला साथिला घेत संघाचे द्विशतक फलकावर लावले. पटेलने 7 तर पंड्याने अवघ्या 30 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारांची वादळी खेळी करत नाबाद 71 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नाथन एलिसने 3, तर जोश हेझलवूडने 2 गडी बाद केले.

\n

संक्षिप्त धावफलक – 

\n

भारत – 20 षटकांत 6 बाद 208 धावा. (लोकेश राहुल 55, सूर्यकुमार यादव 46, हार्दिक पंड्या नाबाद 71, हर्षल पटेल नाबाद 7, नाथन एलिस 3-30, जोश हेझलवूड 2-39).

\n

ऑस्ट्रेलिया – 19.2 षटकांत 6 बाद 211 धावा. (कॅमेरुन ग्रीन 61, स्टिव्हन स्मिथ 35, ऍरन फिंच 22, टीम डेव्हिड 18, जोस इंग्लिस 17, मॅथ्यु वेड नाबाद 45, पॅट कमिन्स नाबाद 4, अक्‍सर पटेल 3-17, उमेश यादव 2-27).

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#INDvAUS 1st T20 : पहिल्या टी-20 लढतीत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/ex.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-t20-australia-beats-india-in-1st-t20-match#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/ex.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-t20-australia-beats-india-in-1st-t20-match#webpage","name":"#INDvAUS 1st T20 : पहिल्या टी-20 लढतीत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात","url":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-t20-australia-beats-india-in-1st-t20-match","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-t20-australia-beats-india-in-1st-t20-match#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/ex.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-t20-australia-beats-india-in-1st-t20-match#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/indvaus-1st-t20-australia-beats-india-in-1st-t20-match","name":"#INDvAUS 1st T20 : पहिल्या टी-20 लढतीत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात"}}]}}}

#INDvAUS 1st T20 : पहिल्या टी-20 लढतीत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात