Kokilaben Ambani : उद्योगपती मुकेश अंबानींच्या मातोश्रींची तब्येत अचानक बिघडली; कोकिलाबेन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

Kokilaben Ambani : रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त फ्री प्रेस जनरलने दिलं आहे.
कोकिलाबेन अंबानी या ९१ वर्षांच्या आहेत. कोकिलाबेन यांची तब्येत बिघडल्याने संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईला पोहोचले आहे. यादरम्यान अनिल आणि टीना अंबानी खूप चिंतित दिसत होते. मात्र, याबाबत अद्याप रिलायन्स किंवा अंबानी कुटुंबाकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
कोकिलाबेन यांची प्रकृती अचानक बिघडल्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यांचं वय वाढल्याने त्यांना आरोग्य विषयक समस्या भेडसावत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, त्यांना नेमकं काय झालं आहे, याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.





