इंडोनेशियातील भूकंपातील बळींची संख्या 42 वर
Updated On:

मामुजू – इंडोनेशियाच्या पश्चिमी सुलावेसी प्रांतात झालेल्या मोठ्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 42 झाली आहे. या भूकंपात 800 लोक जखमी झाले आहेत. भूकंपात 15000 हून अधिक लोक बेघर झाले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल वर 6 पूर्णांक 2 दशांश इतकी नोंदली गेली होती.
भूकंपामुळे जिल्ह्यातल्या एका रुग्णालयचेही नुकसान झाले आहे. मामूजू शहराच्या माजीन जिल्ह्यातल्या मैदानावर आपत्कालीन रुग्णालय व्यवस्था उभी करण्यात आली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. भूकंपग्रस्त लोकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.





