Indonesia Open | सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
Updated On:

बाली – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने येथे सुरू झालेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला.
तिने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या व्होनी ली हिचा 21-12, 21-18 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातवी मानांकित असलेल्या सिंधूने 26 व्या मानांकित ली हिच्यावर अवघ्या 37 मिनिटांत मात केली.
या फेरीत आता तिचा सामना दक्षिण कोरियाच्या सीम युजीन व स्पेनच्या बेट्रीज कोराल्स यांच्यातील विजेतीशी होणार आहे.





