Indonesia volcano eruption: इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; 3 पर्यटकांचा होरपळून मृत्यू
Indonesia volcano eruption: या उद्रेकामुळे सुमारे १० किलोमीटर उंचीपर्यंत राख आणि धुराचे लोट हवेत पसरले होते. ज्या वेळी हा स्फोट झाला, तेव्हा ज्वालामुखीच्या विवराजवळ २० गिर्यारोहक उपस्थित होते. या दुर्घटनेत दोन सिंगापूरचे पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

Indonesia volcano eruption: सोशल मीडियासाठी थरारक व्हिडिओ आणि रील बनवण्याचे वेड सध्या अनेकांच्या जीवावर बेतताना दिसत आहे. इंडोनेशियातील ‘माउंट डुकानो’ (Mount Dukono) या सक्रिय ज्वालामुखीच्या परिसरात अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रशासनाने जारी केलेली चेतावणी आणि ‘नो-गो झोन’चे उल्लंघन करून डोंगर चढणाऱ्या २० गिर्यारोहकांपैकी तिघांचा ज्वालामुखीच्या उद्रेकात होरपळून मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय? (Indonesia volcano eruption)
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी इंडोनेशियाच्या हलमहेरा बेटावर असलेल्या माउंट डुकानो ज्वालामुखीचा अचानक मोठा उद्रेक झाला. या उद्रेकामुळे सुमारे १० किलोमीटर उंचीपर्यंत राख आणि धुराचे लोट हवेत पसरले होते. ज्या वेळी हा स्फोट झाला, तेव्हा ज्वालामुखीच्या विवराजवळ २० गिर्यारोहक उपस्थित होते. या दुर्घटनेत दोन सिंगापूरचे पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
इंडोनेशिया में फटा ज्वालामुखी
मना करने के बावजूद Hiking करने गए 3 पर्वतारोही की मौत#Indonesia #volcano pic.twitter.com/1k2Ve3z1Zn— NDTV India (@ndtvindia) May 8, 2026
प्रशासकीय निर्बंधांकडे दुर्लक्ष
डिसेंबर महिन्यापासूनच ‘सेंटर फॉर वोल्केनोलाजी अँड जिओलॉजिकल हॅझार्ड मिटिगेशन’ने (PVMBG) या भागात भूकंपीय हालचाली वाढल्याची नोंद केली होती. पर्यटकांना ज्वालामुखीच्या विवरापासून ४ किलोमीटर अंतरापर्यंत न जाण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. प्रवेशद्वारावर इशारा देणारे फलकही लावण्यात आले होते, मात्र रील बनवण्याच्या नादात पर्यटकांनी या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. (Indonesia volcano eruption)
उत्तर हलमहेराचे पोलीस प्रमुख एरलिक्सन पासारीबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण २० गिर्यारोहक (९ सिंगापूरचे, ११ स्थानिक) होते. १५ गिर्यारोहक डोंगर उतरून सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत. २ गिर्यारोहकांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.गिर्यारोहकांना प्रतिबंधित क्षेत्रात घेऊन जाणाऱ्या गाइड आणि पोर्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
‘रिंग ऑफ फायर’चा धोका – (Indonesia volcano eruption)
इंडोनेशिया हा देश पॅसिफिक महासागरातील ‘रिंग ऑफ फायर’ (Ring of Fire) क्षेत्रात येतो. येथे टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे जगभरातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी आढळतात. एकट्या इंडोनेशियात सुमारे १३० सक्रिय ज्वालामुखी आहेत, ज्यामुळे येथे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात.





