भारताची ताकद वाढली; ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाने गुरुवारी ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या उन्नत आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. 400 किमीच्या रेंजमध्ये कोणतेही लक्ष्य गाठण्यास ते सक्षम आहे. सुखोई एसयू-३० एमकेआय या लढाऊ विमानातून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आल्याचे संरक्षण अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.
ते म्हणाले की, हे क्षेपणास्त्र एसयू-30 एमकेआई लढाऊ विमानातून डागण्यात आले आणि ते बंगालच्या उपसागरात अचूकपणे लक्ष्यावर झेपावले. क्षेपणास्त्राच्या हवेतून प्रक्षेपित केलेल्या जहाजविरोधी आवृत्तीची ही चाचणी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
या चाचणीसह, वायूसेनेने लांब पल्ल्याच्या जमिनीवर किंवा समुद्रातील लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्यासाठी एसयू-30 एमकेआई लढाऊ विमानातून लक्षणीय क्षमता वाढ केली आहे, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, एसयू-30एमकेआई विमानाच्या उच्च कामगिरीसह क्षेपणास्त्राची लांब पल्ल्याची क्षमता हवाई दलाला सामरिकदृष्ट्या मजबूत करेल आणि भविष्यातील युद्धाच्या प्रसंगी शत्रू देशावर हल्ला करण्यासाठी अधिक प्रभावी करेल.
भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, बीएपीएल आणि एचएएल यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हे यश मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे निवेदनात म्हटले आहे.





