भारताचे रशियाशी सामरिक क्षेत्रात संबंध; अमेरिकेचे संबंध “त्या’ क्षेत्रात नाहीत

वॉशिंग्टन – सर्वच राष्ट्रांना आम्ही आंतरराष्ट्रीय हिताचा विचार करून मॉस्कोशी व्यवहार ठरवावा, असे सांगितले आहे. भरताचे रशियाशी अधिपासून घनिष्ट संबंध आहेत. मात्र नंतर तसे संबंध अमेरिकेशी तयार झाले, ते ठिक आहे, अशी भुमिका अमेरिकेने शनिवारी मांडली.
अमेरिका आणि भारतातील द्विपक्षीय संबंध युक्रेनच्या मुद्यावर ताणले जातील का? असा थेट प्रश्न अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांना विचारला त्यावेळी ते म्हणाले, अमेरिका भारतासह महत्वाचे हितसंबंध आणि मुल्यांची भागिदार आहे.
आम्ही भारतासोबत महत्त्वाचे हितसंबंध जोपासत आहोत. भारताचे रशियाचे संबंध आणि आमचे रशियाशी असणारे संबंध यात अंतर आहे. पण ते ठिक आहे, असे राईस यांनी सांगितले.
भारताचे रशियाशी असणारे संबंध आणि आमचे भारताशी असणारे संबंध यात अंतर आहे. रशियाशी भारताचे संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील संबंध आहेत. आमचे भारताशी त्या क्षेत्रात संबंध नाहीत,असे ते म्हणाले.





