पंघाल, संजीतला सुवर्णपदक
Updated On:

पॅरिस –फ्रान्समध्ये झालेल्या ऍलेक्सि व्हॅस्टिन आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालने 52 किलो गटात, तर संजीतने 91 किलो गटात सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. करोनाच्या धोक्यानंतर सुरू झालेली ही पहिलीच स्पर्धा होती व भारतीय खेळाडूदेखील जवळपास सात महिन्यांनंतर स्पर्धा खेळत होते.
अंतिम फेरीत अमितने अमेरिकेच्या रेने अब्राहमचा 3-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात संजीतने यजमान फ्रान्सच्या सोहेब बौफियावर मात करत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्यासह आशिष कुमारनेही सुवर्णपदक पटकावले. अर्थात, या सामन्यात त्याला अमेरिकेच्या जोसेफ जेरोमीने पुढे चाल दिली.





