अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीत भारतीयांचा बोलबाला

नवी दिल्ली – फोर्ब्सच्या अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांच्या यादीत सात भारतीय अमेरिकन नागरिकांचा समावेश झाला आहे. या यादीतील भारतीय नागरीकांची संख्या वाढू लागली आहे.
या यादीत जय चौधरी 61 व्या स्थानावर आहेत, तर रमेश वाधवानी हे 238 व्या स्थानावर आहेत.
नीरज शाह यांना फोर्ब्सच्या यादीत 299 वे स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे 2.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला हे 2.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 353 व्या स्थानावर आहेत. कवितर्क राम श्रीराम यांना या यादीत 359 वे स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे 2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
याशिवाय तर राकेश गंगवा, अनिल भुसरी यांचा या यादीत समावेश आहे. 400 जणांच्या या यादीत सलग तिसऱ्या वर्षीही ऍमेझॉनच्या जेफ बेझोस पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे 179 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर 111 अब्ज डॉलर्स संपत्तीसह बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत.





