Bajrang Punia Post : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या वडिलांचे निधन; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Bajrang Punia Post : ओलंपिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील बलवान पूनिया यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते फुफ्फुसांचा गंभीर आजाराने ग्रस्त होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालावली आहे. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची भावनिक पोस्ट बजरंग पुनिया यांनी एक्सवरून शेअर केली आहे.
बजरंग पुनिया यांची भावनिक पोस्ट
बापूजी आता आपल्यात नाहीत. आज संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खूप मेहनत करून त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवले. ते आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आधारस्तंभ होते. आता कोणाकडे पाहू तुमच्या शिवाय पुढचा प्रवास कसा असेल, हे समजत नाही, अशी भावनिक पोस्ट बजरंग पुनिया यांनी केली आहे. तसेच उद्या सकाळी 11 वाजता आमच्या खुडन गावात त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत, अशी माहिती त्यांनी पोस्टद्वारे दिली.
बापूजी हमारे साथ नहीं रहे. आज शाम सवा छह बजे उन्होंने आख़िरी सांस ली.
उन्होंने बड़ी मेहनत से हम लोगों को यहाँ तक पहुंचाया था. वे हमारे पूरे परिवार की रीढ़ थे. समझ नहीं आ रहा कि उनके बिना आगे जीवन कैसा होगा.
उनका अंतिम संस्कार हमारे गाँव खुडन में सुबह 11 बजे किया जाएगा.
बजरंग… pic.twitter.com/h0omVp8SGa
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) September 11, 2025
वडिलांच्या निधनाने पुनिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बलवान पूनिया स्वतःही कुस्तीपटू होते. लहानपणीच त्यांनी बजरंगला कुस्तीच्या आखाड्यात उतरले.
बजरंग पुनिया यांनी 7 सप्टेंबर 2024 रोजी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली सहकारी विनेश फोगटसोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गेल्या वर्षी अॅाक्टोबरमध्ये नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा त्यांनी स्वीकारली होती.
हेही वाचा : Pimpri News | महापालिकेची नवीन ऑफर ; ऑनलाईन मालमत्ता कर भरा आणि मिळवा थेट ४% सवलत





