WOMEN’S U19 WORLD CUP: भारतीय महिला संघ फायनलमध्ये पोहोचला; 2 फेब्रुवारीला विजेतेपदासाठी दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

WOMEN’S U19 WORLD CUP: महिला अंडर-19 T-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने इंग्लंडचा 9 विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारताच्या मुलींनी अंतिम फेरीचे तिकीटही निश्चित केले आहे. पारुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्मा यांच्या फिरकीपुढे इंग्लिश संघाचे फलंदाज पूर्णपणे असहाय दिसले आणि संघाला 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 113 धावा करता आल्या. भारतीय संघाने हे लक्ष्य 15 षटकांत केवळ एक विकेट गमावून पूर्ण केले. जी कमलिनीने शानदार फलंदाजी करत 50 चेंडूत 56 धावांची नाबाद खेळी केली, तर त्रिशाने 35 धावांचे योगदान दिले.
कमलिनी-त्रिशाने खेळली शानदार खेळी –
114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिशा गोंगडी आणि कमलिनी यांनी भारतीय संघाला शानदार सुरुवात करून दिली आणि अवघ्या 8.6 षटकात पहिल्या विकेटआधी 60 धावा केल्या. त्रिशा 29 चेंडूंचा सामना केल्यानंतर 35 धावा करून बाद झाली. मात्र, कमलिनीने दुसऱ्या टोकाकडून शानदार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाच्या ओपनिंग बॅट्समनने 50 बॉलमध्ये 56 रन्सची नाबाद इनिंग खेळली. या खेळीदरम्यान कमलिनीने 8 चौकार लगावले. तर सानिका चाळके 11 धावा करून नाबाद राहिली. भारतीय संघाने हे लक्ष्य 15 षटकांत केवळ एक विकेट गमावून पूर्ण केले.
TEAM INDIA INTO THE FINAL OF THIS WOMEN’S U19 WORLD CUP..!!!! 🏆
– The Domination of Team India continues..!!!! 🇮🇳 pic.twitter.com/5wtZac54RG
— Indian Women Cricket | WPL #WPL2024 (@BCCIWomenLIVE) January 31, 2025
पारुनिका-वैष्णवीने केला कहर –
तत्पूर्वी, गोलंदाजीत भारतीय संघातील पारुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्मा यांनी आपल्या फिरत्या चेंडूंनी कहर केला. पारुनिकाने 4 षटकात केवळ 21 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्याचवेळी या स्पर्धेतील वैष्णवीची उत्कृष्ट कामगिरी उपांत्य फेरीच्या सामन्यातही कायम राहिली आणि तिने 23 धावा देताना इंग्लिश संघाच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचवेळी आयुषी शुक्लानेही दोन विकेट घेतल्या. आता टीम इंडिया 2 फेब्रुवारीला विजेतेपदासाठी दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना रविवारी क्वालालंपूर येथे होणार आहे.





