अमेरिकेच्या टार्गेट स्टोअरमध्ये भारतीय महिला काय करत होती? ; हुंदके देत रडतानाचा व्हिडीओ व्हायरल ; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

Indian woman thief। अमेरिकेतील एका टार्गेट स्टोअरमधून चोरी करताना एका भारतीय महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आता या महिलेचा बॉडीकॅम व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, पोलिस तिची चौकशी करताना दिसत आहेत. तर ती महिला रडताना आणि हुंदके देताना दिसत आहे. या वर्षी १५ जानेवारीची ही घटना घडली आहे. मात्र, हा व्हिडिओ अलीकडेच एका यूट्यूब चॅनेलवर अपलोड झाल्यानंतर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये, महिला स्वतःला गुजराती म्हणून वर्णन करत आहे.
व्हिडिओमध्ये काय दाखवण्यात आले? Indian woman thief।
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, महिला सतत हुंदके देत होती आणि पोलिसांचे म्हणणे आहे की ती गेल्या ४० मिनिटांपासून या अवस्थेत होती. जेव्हा महिलेला तिची प्राथमिक भाषा विचारण्यात आली तेव्हा तिने गुजराती म्हटले. ही भाषा कुठून येते असे विचारले असता तिने ‘भारत’ असे उत्तर दिले. जेव्हा पोलिसांनी विचारले की तिला दुभाष्याची गरज आहे का, तेव्हा महिलेने नकार दिला. पोलिसांनी महिलेला असेही विचारले की तिला काही आरोग्य समस्या आहेत का, कारण ती सतत हुंदके कत होती.
चौकशीदरम्यान सत्य बाहेर आले Indian woman thief।
तपासादरम्यान, ती महिला त्या टार्गेट स्टोअरची सिरीयल शॉपलिफ्टर असल्याचे आढळून आले, परंतु तिला पहिल्यांदाच पकडण्यात आले. महिलेने असेही कबूल केले की ती चोरीच्या काही वस्तू पुन्हा विकण्याचा विचार करत होती. चौकशीदरम्यान, महिलेला एका अज्ञात व्यक्तीचा फोन देखील आला, परंतु फोन करणाऱ्याची ओळख उघड झाली नाही. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि वापरकर्ते देखील त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.





