Scottish Squash Junior Open 2023 : अनहतला स्कॉटिश ज्युनियर ओपनचे विजेतेपद…
Updated On:

नवी दिल्ली – भारताची प्रतिभावान युवा खेळाडू अनहत सिंग हिने एडिनबर्ग येथे आयोजित २०२३ स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॉशमध्ये मुलींच्या अंडर-१९ विजेतेपदासाठी चमकदार कामगिरी केली. अनहतने अंतिम फेरीत रॉबिन मॅकअल्पाइनवर ११-६, ११-१, ११-५ असा विजय मिळवला.
यासह १५ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत भारताच्या सुभाषीष चौधरीने देशबांधव शिवेन अग्रवालचा ५-११, ११-४, ६-११, ११-८, ११-५ असा पराभव केला, तर १३ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत श्रेष्ठा अय्यरने श्रेयांशचा ११-८, ११-८, ३-११, ११-८ असा पराभव केला.
अव्वल मानांकित भारताच्या आद्या बुधियाने मुलींच्या १३ वर्षांखालील फायनल जिंकली आणि अव्वल मानांकित प्रभाव बाजोरियाने ११ वर्षांखालील मुलांची अंतिम फेरी जिंकली. दिव्यांशी जैन ही ११ वर्षांखालील गटात उपविजेती ठरली.

