‘भारतीय संघाकडे कसोटीची मानसिकताच नाही…’ – रिकी पॉंटिंग
Updated On:

ओव्हल – भारतीय संघाकडे कसोटी क्रिकेट खेळण्याची मानसिकताच नाही. आयपीएल स्पर्धेच्या मानसिकतेतून ते अद्याप बाहेरच आलेले नाहीत, असे परखड मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने व्यक्त केले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्या प्रकारे अत्यंत बेजबाबदार पद्धतीने भारताचे प्रमुख फलंदाज बाद झाले ते पाहून तरी असेच वाटते की, त्यांना टी-20 क्रिकेट खेळण्याच्या मानसिकतेतून बाहेरच येता आलेले नाही.
याउलट ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक खेळाडूने या सामन्यासाठी नेटमध्येच नव्हे तर मानसिक स्तरावरही परिपूर्ण तयारी केली होती, असेही तो म्हणाला.





