Indian students in iran: इराणमध्ये युद्धाच्या भीतीने भारतीय विद्यार्थी हादरला; दूतावासाकडे मदतीची आर्त हाक
Indian students in iran: विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, परीक्षांबाबतचा निर्णय हा केवळ विद्यापीठाच्या हाती नसून तो इराण मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भारत सरकारने राजनयिक पातळीवर हस्तक्षेप करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Indian students in iran: इराणमध्ये सध्या युद्धाचे ढग जमा होत असताना तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. मुसैद नावाच्या भारतीय विद्यार्थ्याने व्हिडिओ जारी करून भारत सरकार आणि भारतीय दूतावासाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे.
मुसैदने व्हिडिओमध्ये सांगितले की, इराणमध्ये आतून परिस्थिती ठीक असली तरी बाहेरून चित्र अत्यंत गंभीर आहे. येत्या काही दिवसांत युद्ध भडकण्याची शक्यता असून परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती आहे. मात्र, या कठीण काळातही विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित असल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
#WATCH | Tehran, Iran: On the situation in Iran, an Indian student, Musaid, says, “Internally the situation is fine in Iran, but externally the situation is very bad. They are saying that there will be a war and many things will go wrong in the coming days. But we have some exams… pic.twitter.com/KgXwCg2q6q
— ANI (@ANI) February 24, 2026
भारतीय दूतावासाने इराणच्या विद्यापीठ प्रशासन आणि इराण मंत्रालयाशी संपर्क साधून परीक्षा पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती मुसैदने केली. “परिस्थिती सुधारेपर्यंत आम्हालाही घरी परतता यावे यासाठी दूतावासाने हस्तक्षेप करावा,” असे आवाहन त्याने केले.
विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, परीक्षांबाबतचा निर्णय हा केवळ विद्यापीठाच्या हाती नसून तो इराण मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भारत सरकारने राजनयिक पातळीवर हस्तक्षेप करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.





