Scotland News : ब्रिटनमधील बेपत्ता भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला

लंडन : ब्रिटनमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासून बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह स्कॉटलंडमधील नदीमध्ये सापडला आहे. ओळख पटवण्यासाठी या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांच्याकडून अद्याप याबाबत खात्रीलायक उत्तर मिळू शकलेले नाही.
संत्र साजू असे या भारतीय विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळची केरळमधील रहिवासी होती. स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्गमधील हेरिओट वॉल्ट विद्यापीठामध्ये ती शिकत होती. शहरातल्या न्यूब्रिज जवळच्या नदीमध्ये एक मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी एका निवेदनामध्ये म्हटले आहे. पोलिसांना याबाबत शुक्रवारी २७ डिसेंबरला माहीती मिळाली.
औपचारिक ओळख अद्याप व्हायची आहे. मात्र संत्र साजू (२२ वर्षे) च्या कुटुंबाला याची माहिती देण्यात आली आहे. हा मृत्यू संशयास्पद आहे. साजू ६ डिसेंबर रोजी संध्याकाळी लिव्हिंगस्टनच्या अल्मंडवाले येथील असडा सुपरमार्केट स्टोअरमध्ये असल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसले होते. त्याच्या वर्णाशी जुळणारा मृतदेह मिळाल्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. साजूच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.





