जैन यांनी भारतीय दूतावास, अमेरिका आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणात जयशंकर यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात लिहिताना त्यांनी,”या विद्यार्थ्याचे काय होत आहे ते कोणीतरी शोधून काढावे.” असे आवाहन केले आहे. अशी प्रकरणे दररोज उघडकीस येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
\nभारतीय दूतावास सक्रिय Indian student handcuffed।
\nव्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका दिवसानंतर, नेवार्कमधील भारतीय दूतावासाने या घटनेवर भाष्य केले आणि म्हटले की, त्यांना सोशल मीडियावर अनेक पोस्ट आढळल्या आहेत ज्यात दावा करण्यात आला आहे की नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भारतीय नागरिकाला अडचणींचा सामना करावा लागला. या संदर्भात आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी वाणिज्य दूतावास नेहमीच वचनबद्ध आहे.
लोकांचा राग आला समोर
\nभारतीय वंशाच्या व्यावसायिकाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच. त्याचप्रमाणे लोकांचा राग समोर येऊ लागला. बऱ्याच लोकांनी सांगितले की परिस्थिती जवळजवळ सर्वत्र सारखीच आहे. अधिकारी कोणाचेही ऐकत नाहीत आणि नागरिकांशी गैरवर्तन करतात. या घटनेपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशनवर कारवाई केली होती आणि शेकडो भारतीयांना भारतात परत पाठवले होते. त्यादरम्यान, नागरिकांच्या हाताला आणि पायाला बेड्या घालण्यात आल्या. व्हिडिओमध्ये भारतीयांना ओढून नेले जात असल्याचे दिसून आले.