Indian Stock Market। अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफच्या भीतीवर मात करून आज भारतीय शेअर बाजार रिकव्हरी मोडमध्ये सुरु झाला. सोमवारी मोठ्या घसरणीला सामोरे जाल्यानंतर, बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्सने १२०० अंकांची वाढ नोंदवली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ३५० अंकांच्या जोरदार उडीसह व्यवहार सुरू केला. दरम्यान, टाटा स्टील, टाटा मोटर्सपासून ते अदानी पोर्ट्सपर्यंतच्या शेअर्समध्ये ग्रीन झोनमध्ये व्यवहार होताना दिसून आला. TATA सह या १० शेअर्सचा बाजारात धुमाकूळ Indian Stock Market। शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान, लार्ज-कॅप श्रेणीतील १० शेअर्समध्ये तुफानी वाढ झाली. त्यापैकी टायटन (५.०१%), अदानी पोर्ट्स (३.६४%), बजाज फिनसर्व्ह (३.०५%), टाटा स्टील (३.०२%), अॅक्सिस बँक (३%), टाटा मोटर्स (३.२४%), एसबीआय (२.७९%), झोमॅटो (२.२२%), इंडसइंड बँक (२.०६%), रिलायन्स (१.२०%) यांचे शेअर्स तेजीने व्यवहार करताना दिसून आले. याशिवाय, पॉलिसी बाजार शेअर (५.३२%), गोदरेज प्रॉपर्टीज शेअर (५.१३%), डिक्सन शेअर (४.७२%), माझगाव डॉक शेअर (४.४७%), आयआरईडीए शेअर (४.१४%), एमक्युअर फार्मा शेअर (३.९०%) यासारख्या मिडकॅप श्रेणीतील शेअर्समध्ये वाढ झाली, तर स्मॉलकॅप शेअर्समध्ये केडीडीएल शेअर ९.३१%, तर बुलेजेट शेअर ७.६३% ने वाढला. सकारात्मक जागतिक संकेत मिळत होते सोमवारी शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसू लागले होते. जपान आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून येत होती, तर गिफ्ट निफ्टीमध्येही सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे ४०० अंकांची वाढ दिसून आली. जपानच्या निक्केईमध्ये ७% ची जबरदस्त वाढ दिसून आली. हाँगकाँग हँगसांग निर्देशांक देखील सुमारे ३% वाढीसह व्यवहार करत होता. काल शेअर बाजारात हाहाकार Indian Stock Market। सोमवारी, शेवटच्या व्यवहार दिवशी, भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. बीएसई सेन्सेक्स ७१,४४९ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ७५,३६४.६९ वरून घसरला आणि लवकरच ७१,४२५ च्या पातळीवर घसरला. जरी शेवटी काही प्रमाणात सुधारणा दिसून आली, तरीही बीएसई सेन्सेक्स २२२६.७९ अंकांनी किंवा २.९५ टक्क्यांनी घसरून ७३,१३७.९० वर बंद झाला. सेन्सेक्सप्रमाणेच, निफ्टीनेही ट्रेडिंग दिवसाची सुरुवात २१,७५८ वर केली, जो त्याच्या मागील बंद २२,९०४ पेक्षा कमी होता आणि दिवसभरात तो जवळजवळ १,००० अंकांनी घसरून २१,७४३ वर पोहोचला. शेवटी, एनएसई निफ्टीनेही काही सुधारणा दर्शविली आणि ७४२.८५ अंकांनी किंवा ३.२४ टक्क्यांनी घसरण होऊन २२,१६१.६० पातळीवर बंद झाला.