Kangana Ranaut : भोपाळमधील ट्विशा शर्मा आणि ग्रेटर नोएडामधील दीपिका नगर या दोन तरुण महिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हुंडाबळी, घरगुती हिंसाचाराच्या या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर हुंडाबळी आणि घरगुती हिंसेच्या वाढत्या घटनांवर कठोर कायद्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणावतने प्रतिक्रिया देत तरुण मुलींना आणि महिलांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. Heat Stroke: सतत डोकेदुखी, चक्कर आणि उलट्या? हीट स्ट्रोकची ही ५ लक्षणे अजिबात दुर्लक्ष करू नका कंगनाने दोन्ही प्रकरणांवर प्रतिक्रिया देताना भारतीय समाजातील एका कटू वास्तव समोर आणलं आहे. पोस्ट करत कंगनानं लिहिलं की, “दररोज विवाहित तरुण महिलांबद्दल अत्यंत दुःखद बातम्या समोर येत आहेत. (Kangana Ranaut) अनेक सुशिक्षित मुली अशा प्रकारच्या दुर्घटना घडण्यापूर्वी आपल्या पालकांकडं मदतीची याचना करतात, त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी गयावया करतात. परंतु, आपला भारतीय समाज मुलींचं लग्न झाल्यानंतर त्यांना सासरी एकटं सोडून देण्यासाठी बदनाम आहे. पुढे कंगनानं तरुणींना आत्मनिर्भर होण्याचं आवाहन करत म्हंटले की, “तुमच्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीपेक्षा तुमचं करिअर सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत नाही, तोपर्यंत लग्नाचा विचारही करू नका. संकटात, अडचणींत असाल तर तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही काय करता आणि स्वतः काय आहात, हे तुम्ही कोणाशी लग्न करता यापेक्षा कितीतरी पटीनं महत्त्वाचे आहे. तुम्हाला हवं तसं आयुष्य स्वतः घडवा. अशा परिस्थितीत कोणाचेही ऐकू नका,” असा सल्ला कंगणाने दिला आहे. तिच्या या भुमिकेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. Kangana Ranaut काय आहेत ही दोन्ही प्रकरणे? (Kangana Ranaut) ट्युशा शर्मा केस (भोपाळ): मूळची नोएडाची असलेली आणि कंटेंट क्रिएटर असलेली ३१ वर्षीय ट्युशा शर्मा भोपाळमध्ये तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. ती दोन महिन्यांची गरोदर होती. तिचं लग्न एका वकिलाशी झालं होतं. ट्युशाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, लग्नानंतर तिचा मानसिक आणि भावनिक छळ केला जात होता, ज्याला कंटाळून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. दीपिका नगर केस (ग्रेटर नोएडा): २४ वर्षीय सुशिक्षित दीपिका नगर हिनं हुंड्याच्या त्रासाला कंटाळून छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. मात्र, शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या असून, सासरच्या लोकांनी तिचा खून करून मृतदेह छतावरून खाली फेकल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. फॉर्च्युनर कार आणि ५० लाख रुपयांच्या मागणीसाठी तिचा छळ केला जात होता. या दोन्ही प्रकरणांचा पोलीसांकडून तपास सुरू आहे. Kangana Ranaut कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या मंडी (हिमाचल प्रदेश) येथून भाजपची खासदार आहे. याशिवाय अलिकडेच कंगणाने इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण केली आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी तिने ‘गँगस्टर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट ‘इमर्जन्सी’ होता, ज्याचे दिग्दर्शनही तिने केले. हेही वाचा: Heat Stroke: सतत डोकेदुखी, चक्कर आणि उलट्या? हीट स्ट्रोकची ही ५ लक्षणे अजिबात दुर्लक्ष करू नका