भारतीय खेळाडूंना आयसीसीने डावलले
Updated On:

दुबई – आयसीसीने आपला जागतिक टी-20 संघ जाहीर केला. मात्र, त्यात एकाही भारतीय क्रिकेटपटूला स्थान दिलेले नाही. संघाचे नेतृत्व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
पाकिस्तानचा फखर झमानही या संघात आहे. या संघात बांगलादेशचे तीन आणि श्रीलंका, आयरलॅंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानचे प्रत्येकी 2 खेळाडू आहेत.
आयसीसीचा संघ – पॉल स्टर्लिंग (आयर्लंड), जनेमन मलान (दक्षिण आफ्रिका), बाबर आझम (पाकिस्तान), फखर झमान (पाकिस्तान), रूसी वॅन दर दुसेन (दक्षिण आफ्रिका), शकिब अल हसन (बांगलादेश), मुशफिकूर रहीम (बांगलादेश), वनिंदू हसरंगा (श्रीलंका), मुस्तफिजूर रेहमान (बांगलादेश), सिमी सिंग (आयरलॅंड), दुश्मंता चमीरा (श्रीलंका).





