Indian Navy : भारतीय नौदलाची युद्धनौका कदमत्त फिजीमध्ये दाखल

सुवा (फिजी) : भारतीय नौदलातील आयएनएसस कदमत्त ही स्वदेशी बनावटीची आणि पाणबुडीविरोधी युद्धनौका फिजीतील सुवा येथे पोहोचली आहे. भारत आणि फिजी दरम्यानच्या सदिच्छा भेटीचा भाग म्हणून तीन महिने या युद्धनौकेचा मुक्काम सुवा येथे असणार आहे. सुवा बंदराचा हा दौरा भारत आणि फिजी यांच्यातील खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकांमधील संबंध प्रतिबिंबित करतो.
तर मित्र राष्ट्रांसोबत सागरी सहकार्य आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा अधोरेखित करतो. या भेटीदरम्यान, आयएनएस कदमत्त फिजी प्रजासत्ताक नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वागत करेल. यातून परस्पर हिताचे मार्ग शोधण्यासाठी व्यावसायिक देवाणघेवाण वाढेल. जहाजाचे कर्मचारी विविध सामुदायिक कार्यक्रम, क्रीडा कार्यक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीत सहभागी होतील.
यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील मैत्री आणि सद्भावना यांचे बंध आणखी दृढ होतील.ही भेट भारताच्या प्रदेशातील सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि समग्र प्रगती अर्थात महासागरच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकते आणि हिंद महासागर क्षेत्रातील पसंतीचा सुरक्षित भागीदार म्हणून भारतीय नौदलाची भूमिका अधोरेखित करते.





