Men’s Junior Asia Cup 2024 : गतविजेत्या भारताची धडाकेबाज सुरुवात, थायलंडचा 11-0 ने उडवला धुवा…

Men’s Junior Asia Cup 2024 (Muscat, Oman) : गतविजेत्या भारताने ज्युनियर पुरुष आशिया चषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात झाली. ओमानमधील मस्कत येथे झालेल्या ‘अ’ गटातील सामन्यात बुधवारी भारतीय संघानं थायलंडचा 11-0 असा धुव्वा उडवला.
🏑 Dominant Start! 🇮🇳🔥
The Indian Junior Men’s Hockey Team began their title defense at the 2024 Men’s Junior Asia Cup in style, securing a commanding victory over Thailand in their opening match in Muscat, Oman. 💪
With eyes set on a third consecutive title, the two-time… pic.twitter.com/6ORllFNkII
— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 27, 2024
भारताचा पुढील सामना आता गुरुवारी जपानशी होणार आहे. अ-गटात भारत आणि थायलंडसह चीनी ताइपे, जपान आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे. ब- गटात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश, यजमान ओमान आणि चीन यांचा समावेश आहे.
Syed Modi International 2024 : पी.व्ही सिंधू अन् लक्ष्य सेनची दुसऱ्या फेरीत धडक…
भारताकडून अरिजित सिंग हुंदल (दुसरे मिनिट, 24वे मिनिट), अर्शदीप सिंग (8वे मिनिट), गुरज्योत सिंग (18वे, 45वे मिनिट), सौरभ आनंद कुशवाह (19वे, 52वे मिनिट), दिलराज सिंग (21वे मिनिट) आणि मुकेश टोप्पो (59वे मिनिट) यांनी मैदानी गोल केले. तर शारदा नंद तिवारीने (10वे मिनिट) पेनल्टी कॉर्नरव्दारे गोल केला तर रोहितने (29व्या मिनिटाला) पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर केले.





