‘इंडियन आयडल सीझन १२’चा विजेता पवनदीप राजनचा अपघात; रुग्णालयातील फोटो व्हायरल

Singer Pawandeep Accident | लोकप्रिय रिअॅलिटी शो इंडियन आयडल सीझन १२चा विजेता पवनदीप राजनने आपल्या सुंदर गाण्याने अनेकांची मनं जिंकली. मात्र पवनदीप राजनबाबत एक माहिती समोर आल्याने चाहतेही चिंता व्यक्त करत आहे. पवनदीप राजनचा अपघात झाला असून त्याचा रुग्णालयातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पवनदीप राजनचा सोमवारी पहाटे ३:४० मिनिटांच्या सुमारास अहमदाबादमध्ये मोठा कार अपघात झाला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये पवनदीपच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत आहे. मात्र, अद्याप पवनदीपच्या अपघाताबद्दल इतर अपडेट्स समोर आल्या नाहीत. Singer Pawandeep Accident |
View this post on Instagram
पवनदीप राजनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याला संगीताचा वारसा मिळाला आहे. २०१५ मध्ये पवनदीपने ‘द व्हॉइस’ नावाच्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. सहा वर्षांनंतर तो प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ मध्येही दिसला. या शोमध्येही त्याने आपला ठसा उमटवला आणि विजेता झाला. Singer Pawandeep Accident |
हेही वाचा :





