जगप्रसिद्ध गायिका सेलेना गोमेझचा व्हिडिओ व्हायरल

दिवाळीच्या निमित्ताने इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक भारतीय वंशाची व्यक्ती हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सेलेना गोमेझसोबत दिसत आहे.
प्रसारित होत असलेल्या या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने सेलेनाला जय श्री राम म्हणण्यास सांगितले, परंतु त्याचा अर्थ कळल्यानंतर सेलेनाने हा नारा न म्हणता फक्त ‘धन्यवाद हनी’ म्हटले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जुना असल्याचेही काही लोक म्हणत आहे.
View this post on Instagram
सेलेनासोबतचा हा व्हिडिओ फोटोग्राफर पल्लव पालीवाल यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “आमच्या फॉलोअर्सपैकी एक सेलेना गोमेझला भेटला आणि त्याने दिवाळीच्या निमित्ताने ‘जय श्री राम’ म्हटले.” मात्र, जेव्हा त्या व्यक्तीने सेलेनाला सांगितले की ही भारताची सर्वोत्कृष्ट घोषणा आहे. हे ऐकून सेलेनाने ही घोषणा पुन्हा केली नाही. हा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाल्यापासून लोक त्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. सेलेनाच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यावर बहुतेक लोकांनी नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.
,





