नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जगतातुन एक दुःखद बातमी समोर येत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. तो कॅन्सरशी झुंज देत होते. गुजरातमधील जामनगरमध्ये सलीम यांनी अखेरचा श्वास घेतला. सलीम दुर्रानी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
सलीम दुर्रानी अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले क्रिकेटपटू होते. हा सन्मान त्यांना १९६० मध्ये मिळाला होता. सलीम दुर्रानी यांनी भारतासाठी २९ कसोटी खेळल्या, ज्यात त्यांनी एक शतक आणि सात अर्धशतकांच्या मदतीने १२०२ धावा केल्या. तसेच ७५ विकेट्स घेतल्या.
सलीम दुर्रानी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव सलीम अझीझ दुर्रानी होते. जन्मानंतर तो भारतात आला. त्याचे वडील अब्दुल अझीझ यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अविभाजित भारतासाठी दोन अनधिकृत कसोटी सामने खेळले. फाळणीनंतर त्यांचे वडील अब्दुल अझीझ क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कराचीला गेले तर सलीम दुर्रानी जामनगरमध्ये आईसोबत राहिले. नंतर सलीम राजस्थानला गेला.सलीम दुर्रानी यांनी 1 जानेवारी 1960 रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. दुर्रानी यांनी जवळपास 13 वर्ष भारताकडून क्रिकेट खेळले आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांच्या निधनाने भारतीयांवर शोककळा पसरली आहे. दुर्राणी हे दीर्घकाळ आजारी होते. त्यांची कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जामनगरमध्ये सलीम दुर्राणी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सलीम दुर्राणी अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू आहेत. 1960 मध्ये त्यांना क्रीडा जगतातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सलीम दुर्रानींचे एक वैशिष्ट्य होतं, ते चाहत्यांच्या मागणीनुसार षटकार ठोकत असत. याशिवाय सलीम यांनी गोलंदाजीतही नाव कमावलं आहे. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 75 विकेट्सही घेतल्या आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून सलीम यांची ख्याती होती. सलीम दुर्रानी यांनी केवळ कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी शेवटची कसोटी 06 फेब्रुवारी 1973 रोजी इंग्लंडविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळली होती.
भारतीय क्रिकेट संघातील सर्वात हँडसम प्लेयर म्हणून सलीम दुर्रानी प्रसिद्ध होते. अनेक तरुणांच्या गळ्यातील ते ताईत होते. सलमी यांनी बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमावले आहे. सलीम दुर्रानी त्याच्या जबरदस्त लुक्ससाठीही ओळखले जात होते. त्यांनी बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. 1973 मध्ये सलीम यांनी ‘चरित्र’ नावाच्या चित्रपटात काम केले. त्या चित्रपटात दुर्रानी यांनी तेव्हाच्या स्टार अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबत काम केले होते. याशिवाय सलीम यांना 2011 मध्ये बीसीसीआयकडून सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आले आहे.