राहुलच्या जागी पंत संघात खेळणार? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं…

KL Rahul – भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज केएल राहुल मागील दोन सामान्यात अपयशी राहिला आहे. राहुलला दोन सामन्यात केवळ १३ धावा करता आल्या आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ८ चेंडूत ४ धावा आणि नेदरलँडविरुद्ध १२ चेंडूत ९ धावांवरच तो बाद झाला. त्यामुळे चाहत्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे. राहुलच्या जागी ऋषभ पंतला रोहितसोबत सलामीला खेळावा अशी मागणी केली जात आहे. याबाबत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना विचारले असता, त्यांनी एकदम स्पष्ट उत्तर दिले आहे.
बाबर आझमची इंग्रजी पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
राठोड यांनी म्हटले की, “एका संघातून फक्त ११ खेळाडूच खेळू शकतात, ही गोष्ट सर्वात वाईट आहे. पण मला विचाराल तर राहुलने ( KL Rahul ) सराव सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला जर आता संघातून काढले तर ते एक वाईट उदाहरण सर्वांसमोर येऊ शकते. त्यामुळे आम्ही संघात कोणताच बदल न करण्याचे आतापर्यंत ठरवले आहे. पण या सामन्यात नेमके कोणते बदल होतील, हे खेळपट्टीवर पाहिल्यावर ठरवले जाईल. त्यामुळे भारताच्या ११ सदस्यीय संघात नेमकी कोणाला संधी मिळेल, हे आता सांगता येणार नाही. पण राहुल एक चांगला फलंदाज आहे आणि तो चांगली कामगिरी करेल, यावर आमचा विश्वास आहे.”
त्यामुळे आता राहुलच्या ( KL Rahul ) जागेवर ऋषभ पंतला खेळण्याच्या मागण्यांवर राठोड यांनी पूर्णविराम दिला आहे. पुढील सामन्यातही राहुलच रोहितसोबत सलामीला फलंदाजी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संघ सध्या चांगली कामगिरी करत असून त्यामध्ये कोणतेही बदल करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे खेळपट्टी आणि सामन्याची स्थिती पाहूनच संघात बदल करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही राठोड यांनी स्पष्ट केले.
भारतीय संघ सध्या स्पर्धेत चांगल्या स्थितीत आहे. संघाने पहिले दोन्ही सामने जिंकून गट-२ च्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. भारतासाठी सर्वात मोठी बाब म्हणजे, विराट कोहली दमदार लयीत असून त्याची बॅट विरोधी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करता आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात ५३ चेंडूत ८२ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. तर दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध खेळपट्टी फलंदाजीस कठीण असताना ४४ चेंडूत ६२ धावांची खेळी खेळली.





