Indian Banana Exports – भारताने समुद्र मार्गे नेदरलँडला केळी निर्यात करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. आता भारत रशियाला केळींची निर्यात करण्याची शक्यता आजमावणार आहे. यासंदर्भात चर्चा चालू असून रशियाला वर्षाला एक अब्ज डॉलरची केळी निर्यात केले जाऊ शकतील असे सांगितले जाते. सध्या भारतातून बर्याच देशांना फळांचे निर्यात होते. मात्र ही निर्यात जहाजा ऐवजी विमानाच्या माध्यमातून केली जाते. कारण फळांचे वजन कमी असते. त्याचबरोबर फळे पिकण्याचा कालावधी वेगवेगळ्या असतो. मात्र आता केळीची निर्यात समुद्र मार्गे करण्यात आली आहे. त्यामुळे याच पद्धतीने केळीची निर्यात इतर देशांनाही करण्याच्या शक्यतेवर विचार चालू आहे. केळीशिवाय समुद्रमार्गे आंबे, डाळिंब इत्यादीच्या निर्यातीच्या शक्यतेवरही गंभीरपणे विचार चालू असल्याचे कृषी मंत्रालयातील अधिकार्यांनी सांगितले. आयात – निर्यातदारांच्या ज्या परिषदांमध्ये रशियाचे व्यापारी सहभागी होतात अशा परिषदांमध्ये भारत सहभागी होणार आहे. रशियन आयातदारांना भारतातील केळी संदर्भात माहिती देणार आहे. भारताने 2023- 24 मध्ये 300 दशलक्ष डॉलरच्या केळीचे निर्यात केली. 2022-23 मध्ये ही रक्कम 176 दशलक्ष डॉलर होती. Share Market : सरलेले वर्ष ठरले मोठ्या चढ-उताराचे, अखेरच्या दिवशीही झाली शेअर बाजारात विक्री… 2013 मध्ये एकूण जागतिक केळी निर्यातीत भारताचा वाटा केवळ 0.21% इतका होता. तो 2023 मध्ये 1.74 टक्क्यावर गेला आहे. हे प्रमाण आणखी वाढण्याची क्षमता असून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत. केळीचे उत्पादन वाढावे आणि त्याची निर्यात वाढावी यासाठी केंद्र सरकार शेतकर्यांना मदत करत आहे. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यात योग्य केळीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे शेती मंत्रालयातील अधिकार्यांनी सांगितले.