कोल्हापूरात कोरोना रूग्णांच्या मदतीला आर्मी धावली
Updated On:

कोल्हापूर – कोल्हापूर च्या करवीर तालुक्यातील गिरगांव येथील सर्जेराव कुरणे या कारगिल युद्धात सहभागी असलेल्या माजी सैनिकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. पुन्हा ही स्थिती कोणावर येऊ नये म्हणुन गावातील सीमेवर तैनात असलेल्या आजी सैनिकांनी गावात सुरू असलेल्या कोविड सेंटरला आज ऑक्सिजन मशीन भेट दिले.
गावात सुट्टीवर असलेल्या जवानांनी हे मशीन भास्कर कुरणे आणि गिरगावच्या तरुणांकडे सुपूर्द केले. सैनिकांची ही मदत लाखमोलाची ठरली आहे. सीमेवर देशासाठी लढताना आपल्या पंचक्रोशीतील नागरिकांसाठीही त्यांनी आपले योगदान दिले आहे.





