Team India : भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभवाची धूळ चारली आहे. हा विजय मिळवून दैदीप्यमान कामगिरी करत भारतीय संघाने इतिहास रचला. या विजयाचे श्रेय सर्वच खेळाडूंचे असले तरी विजयाचे शिल्पकार पाच खेळाडू ठरले आहेत. ज्यांच्यामुळे भारतीय संघ विजयी ठरला आहे. जाणून घेऊयात त्या पाच खेळांडूविषयी… १ संजू सॅमसन सेमी फायमन आणि फायनल सामन्यात संजू सॅमसनची कामगिरी लक्षवेधून घेणारी ठरली आहे. या खेळाडूने सर्वांचे मनं जिंकली आहेत. केरळचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन भारतासाठी अत्यंत महत्वाची कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने सर्व सामन्यांमध्ये अर्थशतके ठोकली आहेत. सॅमसनने फलंदाजीसाठी आव्हानात्मक खेळपट्टीवर नाबाद ९७ धावांची आक्रमक खेळी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी ८९ धावांची खेळी त्याने केली. तो या स्पर्धेत भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला असून, त्याची ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवड करण्यात आली आहे. २ जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराहने भारतीय संघाला जिंकून देण्यासाठी ज्या पद्धतीची गोलंदाजी करत बळी घेतल्याने विजयाची वाटचाल आणखी सोपी झाली. त्याने न्यूझीलंडविरुद्ध आपल्या कोट्यातील चार षटकांत १५ धावा देत ४ बळी घेतले. तो या स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला आहे. त्याने ८ सामन्यात १४ बळी घेतली आहेत. ३ ईशान किशन ईशान किशन याने भारतीय संघासाठी ३ अर्धशतके झळकावली. फायनल सामन्यात त्याची कामगिरीत कौतुकास्पद ठरली. केवळ २१ चेंडूत त्याने ५२ धावा केल्या. यावेळी त्याचा २४७.६१ इतका स्ट्राइक रेट होता. या सामन्यात किशनने संजू सॅमसनसोबत ४८ चेंडूंमध्ये १०५ धावांची भागीदारी केली. ईशानने नामिबियाविरुद्धही अर्धशतक केले. त्याने ९ सामन्यांत ३१७ धावा केल्या. तो भारताचा दुसरा सगळ्यात जास्त धावसंख्या करणारा खेळाडू ठरला आहे. ४ हार्दिक पंड्या या स्पर्धेत हार्दिक पंड्याने देखील आपला उत्तम खेळ दाखवला. त्याचे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीकडे योगदान आहे. त्याने ९ सामन्यात एक अर्धशतक ठोकत २१७ धावा केल्या. इतकंच नाही, तर पंड्याने ९ विकेट्सही घेतल्या. त्याची इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील फलदांजी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. ५ शिवम दुबे अंतिम सामन्यात शिवम दुबेने कमाल केली. टीम इंडियाने १५ षटकांत २०३ धावसंख्या केली. संजू सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव हे खेळाडू बाद झाल्यानंतर अशा परिस्थितीत शिवम दुबेने जिमी नीशमच्या षटकात दोन षटकार आणि ३ चौकार मारले. त्याने ८ चेंडूंतील २६ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघ २५५ धावा पूर्ण करु शकला. त्याने उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात २५ चेंडूंमध्ये ४३ धावांची खेळी केली होती. हेही वाचा : Pimpri Chinchwad News : शहरात घुमला जागतिक शांततेचा नारा! आखाती युद्धाच्या छायेखाली श्रमिक रस्त्यावर