#INDvSA T20 Series | टी-20 मालिका भारत जिंकेल – चोप्रा
Updated On:

नवी दिल्ली– भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू असून त्यात यजमान भारतीय संघच जिंकेल, असे भाकीत माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्राने केले आहे.
पहिल्या सामन्यात जरी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही उरलेल्या चारही लढतींसह भारतीय संघच ही मालिका जिंकेल, असे चोप्राने म्हटले आहे. मायदेशात खेळण्याचा लाभ संघाला होणार असून भारतीय संघ प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणार असला तरीही संघातील नवोदित खेळाडू भरात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेतील सरस कामगिरी व अनुभवाचा भारतीय खेळाडूंना निश्चितच फायदा होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.





