Bageshwar Dham : भारत लवकरच हिंदूराष्ट्र बनणार; धीरेंद्र शास्त्रींनी केला दावा, म्हणाले”परदेशी लोकांनाही..”

छतरपूर (मध्य प्रदेश) :– भारत लवकरच हिंदूराष्ट्र बनणार असल्याचा दावा बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे स्वयंभू धर्मगुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले,आज आमच्या कार्यक्रमात परदेशी किनाऱ्यावरील लोकही जमले होते. ते ख्रिस्ती धर्माचे पालन करतात पण सनातन धर्मावर विश्वास ठेवतात. याचा अर्थ असा आहे की परदेशी लोकांनाही असा भारत हवा आहे जिथे सर्व जातीय भेद बाजूला ठेवून लोक अभिमानाने हिंदुत्वाचा जयजयकार करू शकतील. आम्ही हिंदुस्थानी आहोत. हिंदुस्थान म्हणजे ‘हिंदुओं का स्थान’ असे ते म्हणाले.
काहीं जणांनी बागेश्वर धाम शास्त्रींना त्यांच्या समोर चमत्कार करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे त्याला उत्तर देताना शास्त्री यांनी रायपूरमध्ये एएनआयला सांगितले की, असे लोक येतच राहतात. आम्ही बंद दारात काम करत नाही. अशा लोकांनी येथे स्वता उपस्थित राहून खात्री करावी. कोणीही माझ्या शब्दांना आणि कृतींना कॅमेऱ्यात चित्रीकरण करून आव्हान देऊ शकते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/salute-to-chhatrapati-shivaji-maharaj-in-vidhan-bhavan/
ते म्हणाले, देवाच्या व आपल्या गुरुंच्या कृपेने आणि सनातन धर्माच्या मंत्रांच्या सामर्थ्याने मी हे कौशल्य प्राप्त केले आहे.” “प्रत्येकाने ते अनुभवले पाहिजे. ही सत्य सनातन धर्माची घोषणा आहे,” असे ते म्हणाले.





