India Vs England Test : भारताविरुद्ध पराभव होताच इंग्लंडने घेतला मोठा निर्णय ! ‘या’ घातक गोलंदाजाला घेतले ताफ्यात

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने बर्मिंघमच्या एजबेस्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 336 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताने इंग्लंडसमोर 608 धावांचे विशाल आव्हान ठेवले होते, परंतु इंग्लंडचा दुसरा डाव 271 धावांवर आटोपला. आकाश दीपने 6 विकेट्स घेत भारताच्या विजयाचा पाया रचला, तर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी त्याला उत्तम साथ दिली. सामन्याचा सामनावीर पुरस्कार कर्णधार शुभमन गिलला देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
इंग्लंडचा पराभवानंतर तातडीचा निर्णय
दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडने तातडीने संघात बदल केला. जोफ्रा आर्चरच्या समावेशानंतर आता वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनला 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले. विशेष म्हणजे, हा निर्णय पराभवानंतर अवघ्या एका तासात घेण्यात आला. यापूर्वी दुसऱ्या कसोटीआधी जोफ्रा आर्चरला संघात सामील केले गेले होते, परंतु त्याला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही.
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, शोएब बशीर, जॅकब बॅथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जॉश टंग, क्रिस वोक्स.
भारताचा कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, ध्रुव जुरेल, अर्शदीप सिंग.





