IND vs BAN : रोहितच्या नेतृत्वाखाली भारताचा ‘विराट’ पराक्रम, बांगलादेशला क्लीन स्वीप देत केला अविश्वसनीय विक्रम…

Team India Test Series win at Home : कानपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 7 विकेट्सने पराभव केला. कानपूर कसोटी जिंकण्यासोबतच टीम इंडियाने बांगलादेशविरूध्दची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे.
ही कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. रोहित ब्रिगेडने असा पराक्रम केला जो आजपर्यंत जगातील इतर कोणत्याही संघाला करता आलेला नाही.
वास्तविक, नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने मागील 12 वर्षांपासून मायेदशात (घरच्या मैदानावर) एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारताने हा विक्रम कायम राखला आहे. घरच्या भूमीवर भारताचा हा सलग 18वा कसोटी मालिका विजय आहे.
मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणारे संघ….
तसेच मायदेशात सर्वाधिक 18 वेळा कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम आहे. भारतीय कसोटी संघानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे, ज्याने मायदेशात सलग 10 कसोटी मालिका दोनदा जिंकण्याचा विक्रम केला आहे.
1. भारत (2013-2024) : 18* मालिका विजय
2. ऑस्ट्रेलिया (1994-2000) : 10 मालिका विजय
3. ऑस्ट्रेलिया (2004-2008) : 10 मालिका विजय
4. वेस्ट इंडीज (1976-1986) : 08 मालिका विजय
5. न्यूजीलंड (2017-2020) : 08 मालिका विजय
दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे….
भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकून आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. टीम इंडिया आता कसोटीत सर्वाधिक सामने जिंकणारा चौथा संघ बनला आहे. या बाबतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले आहे. सर्वाधिक कसोटी जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे.
IND vs BAN 2nd Test : रविचंद्रन अश्विनने केला नवा विश्वविक्रम, ‘या’ बाबतीत मुरलीधरनची केली बरोबरी..
1. ऑस्ट्रेलिया : 414 कसोटी
2. इंग्लड : 397 कसोटी
3. वेस्टइंडीज : 183 कसोटी
4. भारत : 180 कसोटी
5. साउथ अफ्रीका : 179 कसोटी





