नवी दिल्ली – भारत -ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करार करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. या अगोदर या संदर्भात बोलणी झाली होती. मात्र नंतरच्या काळामध्ये ही बोलणी रेंगाळली होती. आता पुन्हा ही बोलणी सुरू करण्यात येणार आहे. भारत- ब्रिटनदरम्यान सध्या 20 अब्ज डॉलरचाचा व्यापार होतो. हा व्यापार दहा वर्षात तीन पट वाढविण्याचा संकल्प या दोन्ही देशांनी केला आहे. त्या दृष्टिकोनातून ही चर्चा चालू आहे. ही चर्चा पुन्हा सुरू झाल्याची माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे व्यापार मंत्री रेनॉल्ड्स यांनी दिली. गोयल यांनी सांगितले की, भारत -ब्रिटन दरम्यान व्यापार वाढविण्याच्या अमाप संधी आहेत. हे दोन्ही देशांनी ओळखले आहे. सध्या जागतिक बाजारात वातावरण खराब आहे. त्यामुळे विविध देशांना व्यापार वाढविण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्याची गरज आहे. या दृष्टीकोनातून या दोन्ही देशांनी ही चर्चा आजपासून पुन्हा सुरू केली आहे. ही बोलणी शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार करण्यात येणार आहे. पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून दोन्ही देश बोलणी करीत आहेत. ही बोलणी 13 जानेवारी 2022 रोजी सुरू झाली आहे. भारतीय मनुष्यबळाचा ब्रिटनला चांगला उपयोग होतो असे रेनॉल्ड्स यांनी यावेळी बोलताना सांगितले.