India vs South Africa T20 Series 2024 : भारतीय संघाला नुकतेच मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. किवी संघाने घरच्या भूमीवर भारताचा 3-0 असा व्हाईटवॉश केला. आता भारतीय संघ पुढील मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे, जी चार टी-20 सामन्यांची मालिका असेल. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
या चार टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका 8 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना डर्बनमध्ये खेळवला जाईल. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 15 नोव्हेंबरला जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल. या मालिकेसाठी टीम इंडिया सोमवारीच दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. तसेच संघासोबत प्रशिक्षक म्हणून व्ही.व्ही.एस. लक्ष्मणदेखील तिथे पोहचले आहेत. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबतचा खेळाडूंचा एक व्हिडिओदेखील ट्विटरवर शेअर केला आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मणवर प्रशिक्षकपदाची जबाबदारी…
विशेष म्हणजे या दौऱ्यात व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघालाही ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. वृत्तानुसार, टीम इंडिया 10 नोव्हेंबरला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी रवाना होणार आहे. अशा परिस्थितीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी लक्ष्मण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेचं वेळापत्रक…
पहिला टी20 सामना : 08 नोव्हेंबर, डर्बन
दुसरा टी20 सामना : 10 नोव्हेंबर, गकबेराह
तिसरा टी20 सामना : 13 नोव्हेंबर, सेंच्युरियन
चौथा टी-20 सामना : 15 नोव्हेंबर, जोहान्सबर्ग.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार ), अभिषेक शर्मा, संजू सैमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, विजयकुमार विशक, अवेश खान ,यश दयाल.
टी-20 मालिकेसाठी द.आफ्रिका संघ : एडेन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमैन, गेराल्ड कोएट्जी, डोनोवन फरेरा, रीजा हेंड्रिक्स, मार्को जेन्सन, हेनरिक क्लासेन, पैट्रिक क्रूगर, केशव महाराज, डेविड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रयान रिकेलटन, एंडिले सिमलेन, लूथो सिपाम्ला (तीसरा आणि चौथा टी20 सामना), ट्रिस्टन स्टब्स.