South Africa vs India T20 Series 2024 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याचा पहिला सामना डर्बनमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंचा एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंची विमानतळावरच सामान्य चाचणी (General Knowledge)झाली. विशेष म्हणजे हे प्रश्न सहकारी खेळाडूंनीच विचारले.
वास्तविक बीसीसीआयने एक्स (X) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. टीम इंडियाच्या प्रवासाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये खेळाडूंची मजा-मस्ती अन् धमालही पाहायला मिळते. अभिषेक शर्माने तिलक वर्मा यांच्यासह इतर सहकारी खेळाडूंची सामान्य ज्ञान चाचणी घेतली.
Touchdown Durban 🛬🇿🇦
How good is #TeamIndia‘s knowledge of their next destination 🤔#SAvIND pic.twitter.com/m4YjikAw6Y
— BCCI (@BCCI) November 4, 2024
विशेष म्हणजे त्यांने तिलकसह सर्व खेळाडूंना फक्त दक्षिण आफ्रिकेशी संबंधित प्रश्न विचारले. अर्शदीप सिंग यालाही प्रश्न विचारण्यात आले. व्हिडिओमध्ये कॅप्टन सूर्यकुमार यादव मस्ती करताना दिसत होते.
Touchdown Durban 🛬🇿🇦
How good is #TeamIndia‘s knowledge of their next destination 🤔#SAvIND pic.twitter.com/m4YjikAw6Y
— BCCI (@BCCI) November 4, 2024
टीम इंडियाने या खेळाडूंना दिली संधी…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाने अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे. सूर्याच्या नेतृत्वाखालील संघात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, रमणदीप सिंग आणि अक्षर पटेल यांना स्थान मिळाले आहे. हार्दिक पांड्याही संघाचा एक भाग आहे. जितेश कुमार आणि संजू सॅमसनलाही संधी मिळाली आहे. आवेश खान, यश दयाल, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई हे देखील संघात आहेत.
चार सामन्यांची असेल टी-20 मालिका…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला सामना 8 नोव्हेंबरला डर्बनमध्ये खेळवला जाईल. दुसरा सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. तिसरा सामना 13 नोव्हेंबरला तर चौथा सामना 15 नोव्हेंबरला खेळवला जाईल. हा सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे.