मोठी बातमी! भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा घेणार निवृत्ती; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Sania Mirza – भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. १६ जानेवारीपासून सुरु होणारी ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ ही सानियाची शेवटची स्पर्धा असणार आहे. तिने आपल्या निवृत्तीबाबतची माहिती ट्विटरवर पोस्ट करून दिली आहे. सानियाने यापूर्वी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या WTA 1000 दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता तिने ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ या स्पर्धेनंतर आपल्या कारकीर्दला पूर्णविराम देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही काळापासून सानिया मिर्झा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
पुनित बालन सेलिब्रीटी लीग; पन्हाळा जॅग्वॉर्स, रायगड पँथर्स संघांची विजयी कामगिरी
आपल्या कारकिर्दीतून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करताना सानियाने भावुक संदेश लिहिला आहे. यावेळी तिने तिच्या आजपर्यंतच्या प्रवासात साथ देणाऱ्या व्यक्तींचेही आभार मानले आहेत. सानिया मिर्झाने म्हटले की, ऑस्ट्रेलियन ओपननंतर तिला तिच्या मुलासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. त्याचबरोबर तिने सांगितले की, ३० वर्षांपूर्वी हैदराबादमधील सहा वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत पहिल्यांदा टेनिसच्या कोर्टवर गेली. त्यावेळी तिला प्रशिक्षकाने टेनिस कसे खेळायचे ते समजावून सांगितले. तेव्हा वाटत होते की मी टेनिस शिकण्यासाठी खूप लहान आहे. त्यामुळे माझ्या स्वप्नांसाठीचा लढा वयाच्या सहाव्या वर्षीच सुरू झाला होता, असे सानियाने म्हटले आहे.
सानिया पुढे म्हणाली की, ‘माझे आई-वडील आणि बहीण, माझे कुटुंब, माझे प्रशिक्षक, फिजिओ त्याचबरोबर चांगल्या आणि वाईट काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या संपूर्ण टीमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. मी माझे हसणे, अश्रू, वेदना आणि आनंद त्यांच्या प्रत्येकासोबत शेअर केला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात तुम्ही सर्वांनी मला मदत केली आहे. हैद्राबादच्या या चिमुरडीला तुम्ही स्वप्न पाहण्याची हिंमत तर दिलीच पण ती स्वप्ने पूर्ण करण्यास मदतही केली आहे’, असेही सानियाने म्हटले आहे.
Life update 🙂 pic.twitter.com/bZhM89GXga
— Sania Mirza (@MirzaSania) January 13, 2023
सानिया मिर्झाची कारकीर्द
सानिया मिर्झाने तिच्या कारकिर्दीत एकही सिंगल ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलेले नाही. मात्र, ती डबल्समध्ये सहा वेळा चॅम्पियन ठरली आहे. सानियाने डबल्समध्ये जिंकलेल्या सहा ग्रँडस्लॅम जेतेपदांमध्ये तीन महिला डबल्स आणि तीन मिक्स डबल्स विजेतेपदांचा समावेश आहे. तिने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन महिला डबल्सचे विजेतेपद पटकावले होते.
मिक्स डबल्स – ऑस्ट्रेलियन ओपन (२००९)
मिक्स डबल्स – फ्रेंच ओपन (२०१२)
मिक्स डबल्स- यूएस ओपन (२०१४)
मिक्स डबल्स – विम्बल्डन (२०१५)
मिक्स डबल्स – यूएस ओपन (२०१५)
मिक्स डबल्स – ऑस्ट्रेलियन ओपन (२०१६)




