Australian Open 2023 : एच. एस. प्रणॉयचे विजेतेपद हुकले

मेलबर्न – भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याला रविवारी येथे पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 सीरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रणोयला चीनच्या वेंग होंग याने अटीतटीच्या ठरलेल्या तीन गेममध्ये पराभूत केले. या होंगने हा सामना 9-21, 23-21, 22-20 असा जिंकला.
या पराभवामुळे यंदाच्या मोसमातील सलग दुसरी सुपर सीरीज 500 स्पर्धा जिंकण्याची प्रणोयची संधी हुकली. प्रणोयने या सामन्यात पहिला गेम 21-9 असा सहज जिंकला होता. मात्र, त्यानंतर होंगने जबरदस्त खेळ करत पुढील गोन्ही गेमसह सामना व विजेतेपदही जिंकले.
प्रणॉय आणि वेंग यांच्यामध्ये यापूर्वी एकच सामना झाला होता. त्या सामन्यात प्रणोयने तीन गेममध्ये होंगचा पराभव केला होता. त्यावेळी प्रणॉयने मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. या वेळी मात्र, होंगने त्या पराभवाचा वचपा काढला व पराभवाची परतफेड केली.


