भारत-श्रीलंका मैत्रिपूर्ण सांस्कृतिक आदानप्रदान

पुणे – भारत श्रीलंका मैत्रीपूर्ण सांस्कृतिक आदानप्रदान दौऱ्यानिमित्त २०-२१ नोव्हें. रोजी दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसांदरम्यान भांडारकर रीसर्च ओरियंटल इन्स्टिट्यूटमध्ये विविध कार्यक्रम झाले. डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन इंडिया आणि सुबुद्धी लिटरेचर सर्कल श्रीलंका आणि लोकमान्य सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
२० नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी डाॅ. मुळे यांच्यासह भूपाल पटवर्धन, सुधीर वैशंपायन, सुशील जाधव, प्रदीप दादा रावत, श्रीनिवास कुलकर्णी, मुकुल मारणे, चिन्मय भंडारी, ज्ञानेश्वर मुळे आणि श्रीलंका येथील विविध विद्यापीठामधील विविध मान्यवर प्राध्यापकांनी सहभाग घेतला. यावेळी नीलकंठ प्रकाशन प्रकाशित युगुल या अनंत पाठक लिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. चिन्मय भंडारी यांनी भांडारकर संस्थेविषयी माहिती, भारतीय संस्कृतीबद्दल चित्रफीत सादर करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात होते. या मध्ये लहेजा स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस् तर्फे गणेश वंदना, भांडारकर संस्थेचे अभ्यासक बहुलीकर यांचे व्याख्यान आणि कल्याणी देशपांडे यांचे सतार वादन केले, समीर पुणतांबेकर यांनी त्यांना तबल्यावर साथ संगत केली. त्यानंतर सायंकाळी डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन इंडिया आणि सुबुद्धी लिटरेचर सर्कल श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने “द पोएट्री रेन ऑफ भारत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरवातीला लोकमान्य सोसायटी, पुणे विभागाचे प्रमुख सुशील जाधव यांच्या हस्ते पाहुणे आणि श्रीलकंन कवींचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. लोकमान्य कल्चरल फाउंडेशनच्या वतीने मुकुल मारणे यांनी सर्वांचे स्वागत केले.


