India squad for Zimbabwe Series : झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, सर्व वरिष्ठांना विश्रांती तर ‘या’ युवा खेळाडूच्या खांद्यावर संघाची कमान…

India Squad For Zimbabwe T20I Series : बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी भारत झिम्बाब्वे दौरा करणार आहे. 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. या दौऱ्यासाठी सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी पहिल्यांदाच नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे यांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू प्रथमच भारतीय संघात सामील झाले आहेत. तर, यष्टीरक्षक संजू सॅमसनचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआयने जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. या दौऱ्यात सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग नसतील.
आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. त्यात रुतुराज गायकवाड, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, आवेश खान, मुकेश कुमार आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यावर नवीन खेळाडू पाठवण्याची घोषणा केली आहे.
🚨 NEWS
India’s squad for tour of Zimbabwe announced.#TeamIndia | #ZIMvIND
— BCCI (@BCCI) June 24, 2024
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताच्या 15 सदस्यीय संघात कर्णधार शुभमन गिलसह यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग आणि रियान पराग यांचा फलंदाजीत समावेश आहे. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी हे अष्टपैलू खेळाडू आहेत. वेगवान गोलंदाजीत आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे यांना संधी मिळाली आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया – शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अविनाश खान , खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.





