Women’s T20 World Cup 2024 : भारतीय संघाची घोषणा..! हरमनप्रीत कौर कर्णधार तर ‘या’ खेळाडूंना मिळाले संघात स्थान..

INDIAN TEAM FOR THE T20I WORLD CUP 2024 : येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली असून हरामनप्रीत कौरकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा दुबई आणि शारजाहमध्ये खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची 15 सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताची आघाडीची फलंदाज असणाऱ्या स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. अव्वल फळीतील फलंदाज यस्तिका भाटिया आणि फिरकी अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेत भारतीय संघ दोन सराव सामने खेळल्यानंतर मुख्य स्पर्धेत उतरणार आहे. भारताची सलामीची लढत न्यूझीलंड संघाबरोबर ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी भारतीय संघ पाकिस्तान संघासोबत दोन हात करणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी श्रीलंका व 13 ऑक्टोब रोजी ऑस्ट्रेलियाचे आव्हान भारताच्या महिला संघासमोर असणार आहे.
महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार असून याची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात आली आहे. अ गटात भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया हे संघ तर ब गटात बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व स्कॉटलंड या संघाचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही गटातील टॉप 2 संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र होणार आहेत. पहिला उपांत्य फेरीची लढत दुबई येथे तर दुसरी उपांत्य फेरीची लढत शारजाह येथे खेळविण्यात येणार आहे. उपांत्य फेरीतील विजयी संघ 20 ऑक्टोबर रोजी दुबई येथे विजेतेपदासाठी भिडतील.
🚨 NEWS 🚨
Presenting #TeamIndia‘s squad for the ICC Women’s T20 World Cup 2024 🙌 #T20WorldCup pic.twitter.com/KetQXVsVLX
— BCCI Women (@BCCIWomen) August 27, 2024
भारतीय महिला संघाच्या लढती :
4 ऑक्टोबर 2024 – भारत वि न्यूझीलंड : दुबई
6 ऑक्टोबर 2024 – भारत वि पाकिस्तान : दुबई
9 ऑक्टोबर 2024 – भारत वि श्रीलंका : दुबई
13 ऑक्टोबर 2024 – भारत वि ऑस्ट्रेलिया : शारजाह
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, संजना संजीवन. यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील





