India Embarrassing Records : न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने भारतीय क्रिकेटला काळीमा; श्रेयसच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या नावावर नोंदवले गेले १० सर्वात लाजिरवाणे विक्रम!
India Embarrassing Records : न्यूझीलंडविरुद्धच्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताचे स्टार फलंदाज अपयशी ठरले. या सामन्यादरम्यान भारताने १० लाजिरवाणे विक्रम नोंदवले गेले.

India Embarrassing Records 4th ODI vs New Zealand 89 All Out 244 Run Defeat : शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला २४४ धावांच्या दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. ३३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अवघ्या २६.४ षटकांत ८९ धावांवर गारद झाली. या लाजिरवाण्या पराभवासह भारतीय संघाच्या नावावर एकाच सामन्यात १० लाजिरवाण्या विक्रमांची नोंद झाली आहे.
धावांच्या दृष्टीने सर्वात मोठे आणि ऐतिहासिक पराभव –
- दुसरा सर्वात मोठा पराभव: २४४ धावांनी झालेला हा पराभव भारताच्या एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला; २००० मध्ये श्रीलंकेविरुद्ध २४५ धावांनी झालेला पराभव आजही पहिल्या क्रमांकावर आहे.
- न्यूझीलंडविरुद्ध सर्वात मोठा पराभव: किवी संघाविरुद्धचा हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव ठरला असून यापूर्वी २०१० मध्ये दांबुला येथे भारत २०० धावांनी हरला होता.
- पहिल्या डावातील चौथी सर्वोच्च धावसंख्या: न्यूझीलंडने उभारलेल्या ३३३ धावा ही भारताविरुद्धची त्यांची पहिल्या डावातील चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली.
फलंदाजीची पूर्णपणे दाणादाण आणि नीचांकी धावसंख्या –
New Zealand win the 4th ODI by 244 runs.
We go again for the 5th and final ODI on Sunday with #TeamIndia leading the series 2-1.
Scorecard ▶️ https://t.co/5IIzn3UMi2
#NZvIND https://t.co/a9HZSGxfQK
— BCCI (@BCCI) November 13, 2026
- सहावी नीचांकी धावसंख्या: ८९ धावा हा भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील सहावा सर्वात कमी स्कोर ठरला (सर्वात कमी ५४ धावा).
- आठव्यांदा १०० च्या आत गारद: भारतीय संघ एकदिवसीय इतिहासात आठव्यांदा १०० धावांच्या आत सर्वबाद झाला.
- न्यूझीलंडमधील सर्वात कमी स्कोर: किवी भूमीवर भारताची ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली; यापूर्वी २०१९ मध्ये हॅमिल्टन येथे संघ ९२ धावांवर आटोपला होता.
- न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्यांदा १०० च्या आत: भारताने किवी संघाविरुद्ध तिसऱ्यांदा १०० पेक्षा कमी धावा केल्या (८८, ८९ आणि ९२).
रोहित, विराट आणि श्रेयसच्या नावावर नकोसे विक्रम –
𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝗨𝗻𝗱𝗲𝗿 𝗦𝗵𝗿𝗲𝘆𝗮𝘀 𝗜𝘆𝗲𝗿
▸ For 1st time, Lost vs Ireland in Intl
▸ For 1st time, Lost Series v Ireland
▸ For 1st time, India went winless in five, Six, Seven consecutive T20I matches
▸ For 1st time, Lost by 100+ runs Margin in T20I
▸ Registered Biggest Defeat in T20I (125 runs)
▸ Registered 2nd Biggest Defeat in T20I (87 runs)
▸ Registered 2nd Lowest T20I Score (76/10)
▸ After 12yrs, Lost T20I Series v ENG
▸ After 7yrs, Lost Back to Back T20I Series
▸ For 1st time, Lost an Intl match at Bristol
▸ 1st time, Conceded 200+ Partnership in T20I
▸ 1st time, Conceded 250+ Total in T20I
▸ Lost No.1 T20I Ranking after 1605 days
▸ 1st time Lost 4 matches in a Single T20I Series/Tournaments
▸ 1st time, Lost Back to Back bilateral T20I Series without winning any match
▸ For 1st time, Failed to Defend more than 225+
▸ India Conceded 250+ Thrice, All under him
▸ India Conceded their Highest T20I total (259)
▸ After 7yrs, Lost T20I match in Newzealand
▸ 1st time lost T20I match at Auckland
▸ After 17yrs, India have lost back-to-back T20Is against NZ in a bilateral series!
.
▸ Registered their 2nd Biggest ODI Defeat (244)
▸ Registered Lowest Score in NZ ODIs (89)
▸ After 16yrs, India got all-out under 90To be Continued….
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) November 13, 2026
- ० धावांवर ३ विकेट्स: भारतीय एकदिवसीय इतिहासात पहिल्यांदाच खाते न उघडता तीन फलंदाज (रोहित, विराट, श्रेयस) बाद झाले.
- १६ वर्षांनंतर रोहित-विराट शून्यावर: २०१० नंतर दुसऱ्यांदाच रोहित शर्मा आणि विराट कोहली एकाच एकदिवसीय सामन्यात भोपळा न फोडता तंबूत परतले.
- पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा विक्रम: डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा रोहित शर्मा हा सातवा भारतीय सलामीवीर ठरला; गांगुली आणि सेहवाग प्रत्येकी तीन वेळा असे बाद झाले आहेत.





